आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘गॅस दरवाढीमुळे घरोघरी पुन्हा चुल पेटवण्याची वेळ मोदी सरकारने आणली आहे. गॅस दरवाढ करून भाजपने अदानी, अंबानींच्या कोट्यवधीच्या कर्ज माफीची वसुली सुरू केली आहे’, असा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला. काँग्रेसच्या राजवटीत महागाईच्या विरोधात सतत बोलणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आता कुठे गडप आहेत? गप्प का आहेत? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांच्या फोटो मुखवटे घालून काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोरच मोदी सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत बुधवारी आंदोलन केले. यावेळी पक्षाचे कार्यकर्तेनी दरवाढीच्या विरोधात प्रतीकात्मक पथनाट्य सादर केले.
केंद्र शासनाच्या विरोधात केलेल्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणला. दरवाढ करून देशातील जनतेच्या खिशावर दारोडा टाकला आहे. महागाई कमी करा, दरवाढ मागे न घेतल्यास जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा नरोटे यांनी दिला. यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, नागनाथ कदम, महेश लोंढे, बसवराज म्हेत्रे, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, तिरुपती परकीपंडला, सुमन जाधव, अरुणा वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.