आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:लोकमंगलतर्फे आदर्श शाळा व शिक्षक पुरस्कार

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल फाउंंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी आणि मोहोळ तालुक्यातील पापरी जिल्हा परिषद शाळेस, तसेच १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय येथील किर्लोस्कर सभागृहात कवी इंद्रजित भालेराव, आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.

कर्तबगार व्यक्तीस डाॅ. अब्दुल कलाम पुरस्कार चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रा. डाॅ. संजय चौधरी यांना देण्यात येणार आहे. उपक्रमशील शिक्षक म्हणून मोहोळ तालुक्यातील वरकुटेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पैगंबर तांबोळी, आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून नागनाथ विद्यालयाचे आबाराव गावडे यांना तर प्राध्यापक डाॅ. राजीवकुमार मेंते यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय प्राथमिक- रोहणी चौधरी, परमेश्वर सुरवसे. माध्यमिक - समीर मळ्ळी, अश्विनी मोरे-वाघमोडे. कनिष्ठ महाविद्यालय- प्रशांत चाबुकस्वार, डाॅ. जितेंद्र जळकुंटे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. चार हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

बातम्या आणखी आहेत...