आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:कवितेतून आत्मभानास सामाजिक दायित्वाची जोड‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाच्या उत्क्रांतीमागे स्पर्धा आहे.‎ जगण्यासाठी आणि टिकण्यासाठी सुद्धा‎ स्पर्धा आहे. स्पर्धेला सहकाराची जोड‎ मिळते तेव्हा उत्क्रांती होते. सहकारातून‎ समृद्धी करणारी मंडळीच इथे आहेत.‎ श्रीकांतजींची दृष्टी ही व्यक्तिकेंद्रित नाही‎ तर त्यांची प्रेरणा ही सामाजिक आहे.‎ कवितेतून ते व्यक्त होते. कविता हे जगणे‎ असते. आत्मभानाला सामाजिक भानाची‎ जोड आहे. वर्णनाच्या पुढे जाऊन‎ चिंतनशील विचार बनवते.

विचार जिवंत‎ नसतील तर काही साध्य होत नाही.‎ जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे,‎ असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य संस्कृती‎‎‎‎‎‎‎ मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी‎ काढले.‎ कवी श्रीकांत मोरे लिखित “मनोरम‎ कविता, मनमुक्त, दुनियादारी,‎ जीवनसरिता, रंगमंच, मन मानेल तसे” या‎ सहा काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा पुणे‎ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य‎ कार्यालयातील यशवंतराव चव्हाण‎ सभागृहात पार पडला.

त्यावेळी ते बोलत‎ होते. अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद मोरे होते.‎‎‎‎‎‎‎ व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून‎ राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड,‎ सहकार आयुक्त अनिल कवडे,‎ ‘सारथी’चे कार्यकारी संचालक अशोक‎ काकडे, शैलेंद्र पोळ, प्रकाश पायगुडे,‎ संभाजी काकडे, संजीवनी तडेगावकर,‎ कवी श्रीकांत मोरे, शोभा मोरे, अस्मिता‎ गायकवाड, संतोष सुरवसे, डॉ. दत्ता‎ घोलप, उज्ज्वला साळुंखे, सुरेश‎ शहापूरकर आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...