आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ, पालखी मार्ग विकास आराखड्यांतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, पंढरपूर शहर येथे वारकरी, भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कामांची गुरुवारी पाहणी सामान्य प्रशासनच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केली.
यावेळी अप्पर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी मंदिर, पद दर्शन रांग, मुखदर्शन रांग, विठ्ठल-रुक्मिणी सभा मंडप, दर्शन मंडप, नामदेव पायरी, होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, गोपाळ कृष्ण मंदिर, यमाई तलाव, 65 एकर परिसर येथील पाहणी केली.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पत्रा शेड येथे नव्याने दर्शन मंडप प्रस्तावित केला असून हा दर्शनी मंडप सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहे. यामध्ये भाविकांना आवश्यक सुविधांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
आषाढी आणि कार्तिकी यात्रेनिमित्त गोपाळपूर येथे गोपाळ कृष्ण मंदिरात पौर्णिमेदिवशी गोपाळकाला केला जातो. यादिवशी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी होत असते. येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी गोपाळ कृष्ण मंदिराचा विकास करण्यात येणार येणार आहे. तसेच पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी श्रीमती सौनिक यांना दिली.
यावेळी वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरेचे व मूळ वस्तूचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव व वास्तू विशारद तेजस्विनी आफळे यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त आशिष लोकरे, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.