आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्काम वाढला:अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजेवर; लोहारांचा कोठडीत मुक्काम वाढला

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार होती. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे हे रजेवर असल्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणी करिता सात नोव्हेंबर तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लोहार यांचा न्यायालयीन कोठडीचा मुक्काम तीन दिवस वाढला आहे. लाच स्वीकारल्याप्रकरणी लोहार हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

त्यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर सरकारी पक्षाकडून म्हणणे मांडण्यासाठी शनिवार ५ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हे शनिवारी रजेवर असल्यामुळे म्हणणे मांडता अाले नाही. हे म्हणणे मांडण्यासाठी ७ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. हे म्हणणे मांडल्यानंतर जामिनावर सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...