आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:आदिनाथ कारखान्याचे यंदा 3 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ; अग्निप्रदीपनाने कारखान्याचे धुराडे पेटले

करमाळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपासून बंद असलेला आदिनाथ कारखाना अखेर सहकारी तत्त्वावर सुरू झाला आहे. तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे, असे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले. अग्निप्रदीपन सोहळा रविवारी झाला. या वेळी रश्मी बागल, माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह संचालक मंडळ व कामगार, शेतकरी सभासद उपस्थित होते. तीन वर्षांनंतर कारखाना सुरू होत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.

रामभाऊ महाराज निंबाळकर व विठ्ठल महाराज पाटील यांच्या हस्ते अग्निप्रदीपन झाले. सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक अविनाश वळेकर व त्यांच्या पत्नीच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली. या वेळी व्हाइस चेअरमन रमेश कांबळे, नितीन जगदाळे, माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, डाॅ. वसंत पुंडे, शहाजीराव देशमुख, शिवाजीराव बंडगर, संचालक डाॅ. हरिदास केवारे, प्रकाश झिंजाडे, नामदेव भोगे, पांडुरंग जाधव, लक्ष्मण गोडगे, चंद्रहास निमगिरे, नानासाहेब लोकरे, दिलीप केकाणे, पोपट सरडे, रामभाऊ पवार, सचिन पांढरे, राजेंद्र पवार, माजी संचालक भारत साळुंखे, आबासाहेब डोंगरे, दत्तात्रय जाधव, जयप्रकाश बिले, विकास गलांडे, दिनकर सरडे, भागवत पाटील, दादासाहेब पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, गणेश तळेकर, विजय रोकडे, ॲड. देशपांडे, कल्याण सरडे, लक्ष्मण केकान, रामभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...