आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटातील बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार, मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. ज्या मंत्रिमंडळात महिलाच नाहीत, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री यांनी कृषिमंत्र्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या मंत्र्यांचा केवळ राजीनामाच नाही तर पोलिसांनी देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागी असतो तर सरकारमधून बाहेर पडलो असतो, असे युवा सेनाअध्यक्ष उपमुख्यमंत्री फडणवीस या वाचाळ मंत्र्यांचा राजीनामा घेणार की नाही ? असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला.
कृषी आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कमालीचा पिछाडीवर आहे असे असताना राज्याचे कृषी आणि उद्योग मंत्री काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असताना रोजगारासाठीचे उद्योग थेट गुजरातला जात आहेत. अशावेळी राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे. सरकारची ही मस्ती लवकरच उतरणार असल्याचे सांगत ,हे घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार ! हे लिहून घ्या, अशा शब्दात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर टीकेची झाड उठवली.
सोलापुरातील प्रभाग क्रमांक 10 मधील देगांव येथील शिवसेना शाखा कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
राज्यामध्ये सध्या घटनाबाह्य सरकार बसले आहे . हे सरकार आपल्याला पळवून लावायचे आहे, असे सांगत सरकार पडणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
4 हजार कोटींची मदत देत असल्याची घोषणा आपण ऐकली होती. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र अद्याप एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही. विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करूनसुद्धा ओला दुष्काळ सरकारकडून जाहीर झालेला नाही .बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दारू विचारणाऱ्या कृषी मंत्र्यांचा "ओला" दुष्काळ मिटला .मात्र आपल्या ओल्या दुष्काळाचं काय झालं ? असे सांगत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. समोरील लोकांमधून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पण समाचार घ्या ? असा आग्रह आला .तेव्हा अशांना जास्त किंमत द्यायची नाही, म्हणत त्यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी त्यांनाही लक्ष्य केले.
सुप्रिया सुळे लोकप्रतिनिधी, एका पक्षाच्या नेत्या आहेत, हे आपण थोडे बाजूला ठेवूयात. परंतु त्या एक महिला आहेत, एवढे तरी त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते, असेही ते म्हणाले. यांना सत्तेची मस्ती आली आहे. ज्या मंत्रिमंडळात महिलाच नाहीत, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार, असे सांगत घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री यांनी कृषिमंत्र्यावर कोणतीही कारवाई केली नाही.या मंत्र्यांचा केवळ राजीनामाच नाही तर पोलिसांनी देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ,असेही ते म्हणाले. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागी असतो तर सरकारमधून बाहेर पडलो असतो, असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस या वाचाळ मंत्र्यांचा राजीनामा घेणार की नाही ? असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.