आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगोल्यात शेतकऱ्यांशी संवाद सांधला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सीतारूपी शिवसेनेचे अपहरण या लोकांनी केले आहे. तर सुरक्षेसाठी ईडीला अन् सीबीआयला कामाला लावले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या लोकांच्या तावडीतून शिवसेनेला सोडवा अशी साद शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घातली आहे.
सत्ता गेल्यानंतर आणि एका पटापट एक चाळीस आमदार निघून गेल्यानंतर अडचणीत आलेल्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून या निमित्ताने ते एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर गेलेल्या आमदारांच्या विरोधात वातावरण निर्मिती ही करत आहेत. त्यामुळे आजचा सांगोल्याचा त्यांच्या दौराही याच पद्धतीने अनुभवाला मिळाला. काय झाडी काय डोंगर या डायलॉगने प्रसिद्ध झालेले एकनाथ शिंदे गटात गेल्यापासून शिवसेना शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका करणारे शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी संगेवाडी आणि मांजरी या दोन गावांना भेटी देऊन येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मांजरी गाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आला होता, पण तेथे न जाता आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसले पसंत केले आणि तेथेच ठिय्या मागून शेतकऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. यावेळी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. पीक विमा मंजूर झालेल्या नाही कोणीही आमच्याकडे फिरकले नाहीत, अशा तक्रार शेतकऱ्यांनी केल्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारला भाग तोडून असे सांगितले. हे करत असतानाच आदित्य ठाकरे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. ओके सरकार असा फोनवर विचार त्यांनी वारंवार केला.
सीतारूपी शिवसेनेचे हरण झाले
आदित्य ठाकरे यांना, एक शेतकरी म्हणाला की साहेब सीतारूपी शिवसेनेचे अपहरण या लोकांनी केले आहे. संरक्षणासाठी ईडी आणि, सीबीआयच्या बंदोबस्त लावला आहे, असे सांगितले. त्यांच्या तावडीतून शिवसेनेला सोडवा असे हा शेतकरी म्हणाला.
विद्यार्थ्यांनी एकच आवाज केला अन्...
शेतकऱ्यांच्या संवादानंतर ते सांगून शहराकडे निघाले होते रस्त्यात सांगोला विद्यामंदिर शाळा होती शाळेतील विद्यार्थी कंपाऊंडमध्ये थांबले होते त्यावेळेला शाळेसमोर चौकात थांबली तेव्हा विद्यार्थ्यांनी एकच आवाज दिला आणि ठाकरे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी शाळेच्या कंपाऊंड जवळ गेले विद्यार्थ्यांनी त्यांना सेकंहँड करून जल्लोष करत स्वागत केले. शिवसेनेसाठी वातावरण निर्मिती करण्यात आदित्य ठाकरे यशस्वी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.