आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रलंबित कामे पूर्ण करा, गेल्या चार वर्षांत पंचायत समिती अंतर्गत झालेल्या आर्थिक अनियमितता प्रकरणांची चौकशी पूर्ण करा तसेच घरकुल, आरोग्य, बांधकामसह महत्त्वाच्या विभागातील प्रलंबित कामाचा त्वरित निपटारा करा, ,निधीची कमतरता पडत असेल तर वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवा, अशा सूचना पंचायतराज समितीच्या सदस्य मंडळाने केल्या आहेत.
पंचायतराज समितीचे गटप्रमुख आमदार सुभाष धोंडे यांच्य नेतृत्वाखालील गटाने उत्तर सोलापूर पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी गटविकास अधिकारी जास्मिन शेख, कार्यालयीन अधीक्षक धोत्रे, वारगड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गट शिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार डॉ. प्रदीप देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, विस्तार अधिकारी शंकर पाथरवट, अमोल तोडकरी, राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागने, लेखा विभाग पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कांबळे,भालचंद्र निंबर्गी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात समाधान पॅटर्न राबवा उत्तरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांनी चांगले काम केलं असून संपूर्ण जिल्ह्यात ‘समाधान’ पॅटर्न राबवा आशा सूचना जिल्हा प्रशासन विभागाला समिती सदस्य तथा आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिल्या .बाल विकास प्रकल्पाबद्दल गौरवोद्गार काढले यामुळे उत्तरचे प्रशासन भलतेच खुश झाले.
समितीचे जंगी स्वागत, वर्गणीची चर्चा समितीच्या स्वागतासाठी उत्तर प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. फुलाने सजवलेला बॅनर तयार केला होता. समितीच्या स्वागतासाठी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा केल्याची माहिती समोर येत आहे. एकट्या आरोग्य विभागातील वर्गणीचा आकडा सहा अंकी असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. यामुळेच की काय सतत वादग्रस्त असणाऱ्या उत्तर पंचायत समितीच्या कारभारावर सदस्यांनी स्तुतिसुमने उधळली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.