आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ विकासकामे:प्रशासकीय इमारत अंतिम टप्प्यात, अहिल्यादेवी स्मारक उभारणी सुरू

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ४८२ एकर जागेतील पहिले आणि भव्य परीक्षा भवन, तसेच प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच परीक्षा विभागाचे कामकाज या नव्या इमारतीत होऊ शकेल. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामालाही सुरुवात झाली आहे. प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते आदी कामे बाकी आहेत.

२००४ ते २००७ ५०० एकरचा दिला प्रस्ताव साेलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट २००४ मध्ये झाली. पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी होते. त्यांच्या काळात जमिनीचा शोध घेण्यात आला. ५०० एकर जमीन हवी असल्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने केगाव येथील जमीन संपादित करण्यास अनुमती दिली. तोपर्यंत २००७ मध्ये कुलगुरू डॉ. स्वामी हे सेवानिवृत्त झाले.

२००७ ते २०१२ जमिनीचा ताबा मिळाला द्वितीय कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर होते. प्रत्यक्ष जमिनीचा ताबा या काळातच मिळाला. इतक्या मोठ्या जमिनीला कुंपण घालण्याचा खर्चही विद्यापीठ करू शकले नाही. जैविक पद्धतीने म्हणजे झाडी लावून तात्पुरते कुंपण करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून तळे खाेदले. विविध झाडे लावली. आमराई विकसित झाली.

२०१२ ते २०१७ : बांधकामासाठी अर्ज तृतीय कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार होते. इमारत बांधकाम परवानगीसाठी अर्ज दिला पण ४८२ एकरवर प्रत्यक्ष एकही वीट चढली नाही. परंतु जागेला कुंपण तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे काम सोपवले. त्यानुसार आवश्यक त्या ठिकाणी कुंपण उभे राहिले. सर्व जमिनीला कुंपण शक्य झाले नाही. याच काळात अतिक्रमण, माळढोक आरक्षण, मोबदला वाढवून देण्याची मागणी असे विविध प्रश्न सुरू झाले. संपादित जमिनीच्या काही मालकांची वाढीव नुकसान भरपाई मागणीची प्रकरणे न्यायालयात पोहोचली.

२०१७ ते २०२२ : ३० कोटींची इमारत चौथ्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत बांधकाम सुरू करण्याचा विषय मार्गी लावला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारक बांधकामासाठी मान्यता व निधीही मिळवला. ४० कोटींचा विद्यापीठ निधी उपलब्ध आहे, त्यातून इमारत बांधकामास प्रारंभ करू, दरम्यान शासनाकडून इमारत निधी मिळेल, असा मार्ग त्यांनी स्वीकारला. अधिसभेत विद्यापीठ निधी वापरण्यास मोठा विरोध झाला पण बांधकाम थांबले नाही. सध्या सर्व खर्च विद्यापीठच करत आहे. ३० कोटींची ही इमारत असेल.

बातम्या आणखी आहेत...