आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेह‎ मेळावा:तब्बल 28 वर्षांनी कुमठे प्रशालेतील‎ दहावी बॅचमेटसचा स्नेह मेळावा‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎तब्बल २७ वर्षानंतर कुमठे‎ प्रशालेतील दहावी बॅचमेटसचा स्नेह‎ मेळावा जुळे सोलापुरातील सुरभी‎ हॉल येथे झाला. दहावीतील त्या‎ वेळच्या गुरुजनांचा सत्कार करून‎ आठवणींना उजाळा दिला. या‎ मेळाव्यास जवळपास ८० माजी‎ विद्यार्थी व त्यांना शिकवलेले दहा‎ गुरुजन उपस्थित होते. स्नेह‎ मेळाव्याची प्रस्तावना माजी विद्यार्थी‎ बाळासाहेब शिंदे यांनी केले.‎ सूत्रसंचालन माजी विद्यार्थी गौरप्पा‎ गायकवाड यांनी केले.

तेव्हाचे शिक्षक वाघ, क्षीरसागर,‎ कोरे, दहीटणकर, काशीद, पावले‎ यांनी मार्गदर्शन केले. माजी‎ विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त‎ केले. भीम पवार, मंगल भीमगुरू‎ शकुंतला आवताडे, संगीता फुलारी,‎ स्वाती माने, विजय सुरवसे, सुनील‎ मोरे, बसवराज व्हनगंडे, वसीम‎ शेख, मल्लिकार्जुन ईश्वरकट्टी,‎ बाबू घोडके, सलीम शेख,‎ अविनाश भोसले या विद्यार्थ्यांनी‎ आपले मनोगत व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...