आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावरील भूसंपादन:प्रांतांच्या आश्वासनानंतर प्रहारचे आंदोलन मागे ; योग्य मोबदला देण्याचे देण्यात आले आश्वासन

मंगळवेढाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रांत अधिकारी कार्यालयासमोर गेल्या २५ दिवस दिवसापासून सुरू असलेले प्रहार संघटनेचे आंदोलन प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या लेखी आश्वासनामुळे मागे घेण्यात आले आहे.

प्रहार संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत हे आंदोलनस्थळी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर व प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. बाधित शेतकऱ्यांना एक महिन्यात न्यायालयात पाठपुरावा करून मोबदला वर्ग करू असे प्रांतांनी बच्चू कडू यांना सागून लेखी आश्वासन दिले. प्रहारचे रामदास खोत यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात चर्चेसाठी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांच्या बैठका निष्फळ ठरल्या. राष्ट्रीय महामार्ग १६६ मध्ये गेलेल्या जमिनी भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे प्रहार संघटनेचे सिदराया माळी व मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी आंदोलन सुरू ठेवले. जुनोनी येथील लक्ष्मीबाई बोधगिरे या जिवंत असताना मयत दाखवून त्यांचा मोबदला दुसऱ्याला दिला होता. अखेर त्यांच्या घराचा मोबदला द्यावा लागला. सांगोला येथील मच्छिंद्र कांबळे यांचा हिस्सा त्यांना न्याय प्रविष्ट बाब संपल्यानंतर मोबदला दिला जाईल, अस आश्वासन देण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर, ब्रह्मपुरी, मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या होत्या, त्यांनाही न्याय मिळाला आहे.मंगळवेढा उपविभागीय अधिकाऱ्यानी लेखी आश्वासनात काही टाळाटाळ झाली तर कार्यालयास टाळे ठोकू असा इशार तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...