आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इज ऑफ लिव्हिंग योजना:घर खरेदीनंतर वीज बिलावर नव्या मालकाची ऑनलाइन होईल नोंद

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन घरमालकाचे नाव वीज बिलावर येण्यासाठी पूर्वीच्या पद्धतीला पूर्णविराम मिळाला आहे. ग्राहकांचा वेळ वाचवण्यासाठी महावितरणाने ही प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. घर खरेदीवेळी मुद्रांक शुल्क भरला जातो, त्याच वेळी त्याची माहिती आपोआप महावितरणाला ऑनलाइन पद्धतीने दिली जाते आणि यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. या पद्धतीचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले आहे. ही प्रक्रिया इज ऑफ लिव्हिंग योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे.

घर असो किंवा दुकान, खरेदी केल्यानंतर प्रत्येकजण वीज बिलावर आपले नाव लावतो. नाव लावण्यासाठी प्रथम अर्ज करावा लागत होता. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडली जायची. तसेच, मुद्रांक शुल्क भरल्याची कागदपत्रे जोडावी लागायची. कागदपत्रांची पडताळणी होत असे. काही कागदपत्रे कमी असतील तर पुन्हा जोडली जायची. यामध्ये ग्राहकांचा वेळ वाया जात होता. हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे महावितरणने या प्रक्रियेला पूर्णविराम देऊन ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी व्यवस्था अशी : नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. त्यामुळे नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण होताच याची माहिती महावितरणाला दिली जाते. या आधारे महावितरणाकउून संबंधित वीज ग्राहकाला एसएमएसद्वारे पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाते. शुल्क भरणे, आवश्यक कागदपत्रे घरात बसून अपलोड करण्याविषयी सांगितले जाते. ही प्रक्रिया करताच पुढच्या महिन्यापासून वीज बिल नवीन घर मालकाच्या नावाने होतो. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीजबिल करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाते.

बातम्या आणखी आहेत...