आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:कोरोनानंतर यंदा नवरात्रोत्सवाची धूम, गरबा, दांडिया सरावात रमली तरुणाई

सोलापूर / म. युसूफ शेख25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव संपताच नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे क्लासेस सुरू झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद येथील कोरिओग्राफर सोलापुरात येऊन लेटेस्ट गरबा, दांडिया शिकवत आहे. यापूर्वी तरुणाईने प्रशिक्षण घेतले आहे. सोसायटीमध्ये जावून प्रशिक्षण देत आहेत. यामाध्यमातून रोजगारही उपलब्ध होत आहे व त्यांना व्यासपीठसुद्धा उपलब्ध होत आहे.

गरबा-दांडियाची परंपरा रुजवलेल्या काही अकॅडमींनी गरबा, दांडियाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. गणेशोत्सवातच नावनोंदणी झाली. डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सध्या सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन दोन बॅच सुरू आहेत. २५ सोसायटीमध्ये ज्युनिअर डान्स कलाकारांकडून गरबा दांडिया शिकवला जाणार आहे, अशी माहिती नृत्य शिक्षक राकेश सोनी, श्रीकांत गोचडे यांनी दिली. काही सोसायटींमध्ये जाऊन मोफत ही शिकवतात.

पारंपरिक पोषाखास प्राधान्य
गरबा दांडियामध्ये हिंच, दोडियो, पोपटीयो, दोन ताली, छगडी, रास गरबा, टिटाडा आदी अनेक प्रकार खेळले जात आहे. गरबा खेळताना तरुणी तसेच महिला घागरा, चोली आणि ओढणी परिधान करतात तर पुरुष पारंपरिक धोती आणि कुर्ता परिधान करतात. या खेळाच्या स्पर्धेत अनेक जण भाग घेतात. गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्य, कपडे खरेदीला सुरुवात झाली आहे. एक घागरा चोली एक हजारपासून दहा हजारांपर्यंत आहे.

७ ते ५० वयाच्या महिलांचा सहभाग
पंधरा दिवसाची एक बॅच आहे. याचे शुल्क आकारले जात आहेत. या बॅचमध्ये वय वर्ष सातपासून ते वय वर्ष ५० पर्यंतच्या महिला गरबा शिकत आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या सोसायटीमध्ये गरबा क्लासेस घेतले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...