आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:पंधरा दिवसांनंतर ट्रान्सफार्मर‎ बदलण्याच्या कामाला प्रारंभ‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभारी येथील हणमगाव येथे ट्रान्सफार्मर खराब होऊन‎ पंधरा दिवस उलटले. वारंवार सांगितल्यानंतर महावितरणने‎ ट्रान्सफार्मर बदलण्याचे मनावर घेतले. गुरुवारी ते बदलण्यात‎ येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.‎ या ट्रान्सफार्मरवर पंधरा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन‎ आहे. सर्व्हिस वायर आणि ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड‎ आल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांनी‎ स्वत:च्या पैशातून सर्व्हिस वायर आणली आणि‎ महावितरणाच्या माध्यमातून लावून घेतली. तेवढ्यात‎ ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड आल्याचा मुद्दा समोर आला.‎ शेतकऱ्यांनी शेतात ऊस लावला आहे. विद्युतपुर‎ वठ्याअभावी शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...