आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गणेशोत्सवानंतर गरबा, दांडिया सरावात रमली तरुणाई!

म. युसूफ शेख | सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव संपताच नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे क्लासेस सुरू झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद येथील कोरिओग्राफर सोलापुरात येऊन लेटेस्ट गरबा, दांडिया शिकवत आहे. शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी गरबा-दांडियाची परंपरा जिवंत ठेवली आहे अशा खासगी क्लासेसकडून गरबा, दांडियाच्या क्लासेसला सुरुवात केली. गणेशोत्सवामध्येच त्यांनी नावनोंदणी करून घेतली होती. डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सध्या सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन दोन बॅच सुरू आहेत. २५ सोसायटीमध्ये ज्युनिअर डान्स कलाकारांकडून गरबा दांडिया शिकवला जाणार आहे, अशी माहिती नृत्य शिक्षक राकेश सोनी, श्रीकांत गोचडे यांनी दिली. काही सोसायटीमध्ये जाऊन मोफत ही शिकवतात. ७ ते ५० वयाच्या महिलांचा सहभाग : पंधरा दिवसाची एक बॅच आहे. याचे शुल्क आकारले जात आहेत. या बॅचमध्ये वय वर्ष सातपासून ते वय वर्ष ५० पर्यंतच्या महिला गरबा शिकत आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या सोसायटीमध्ये गरबा क्लासेस घेतले जाणार आहेत.

पारंपरिक पोषाखास प्राधान्य गरबा दांडियामध्ये हिंच, दोडियो, पोपटीयो, दोन ताली, छगडी, रास गरबा, टिटाडा आदी अनेक प्रकार खेळले जात आहे. गरबा खेळताना तरुणी तसेच महिला घागरा, चोली आणि ओढणी परिधान करतात तर पुरुष पारंपरिक धोती आणि कुर्ता परिधान करतात. या खेळाच्या स्पर्धेत अनेक जण भाग घेतात. गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्य, कपडे खरेदीला सुरुवात झाली आहे. एक घागरा चोली एक हजारपासून दहा हजारांपर्यंत आहे.

गरबा, दांडियाबद्दल आवड ^सोलापुरात आल्यापासून नवख्या लोकांना गरबा शिकवते, असे मला वाटत नाही. कारण सोलापूरकरांमध्ये गरबा, दांडिया बद्दलची जी आवड आणि आकर्षण आहे त्यामुळे मला त्यांना शिकवणे खूप सोपे जात आहे सोलापूरकरांचा उत्साह बघून माझाही उत्साह वाढला आहे.'' शीतल, कोरिओग्राफर, अहमदाबाद

बातम्या आणखी आहेत...