आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करता येईल: प्रा. ए. डी. जोशी, अध्यक्ष, जोशी ज्युनिअर कॉलेज
बारावीचा निकाल अतिशय उत्तम असा लागला. विद्यार्थ्यांनी विविध अडचणींवर मात करीत ही परीक्षा दिली. खरेतर कोरोना काळातील वाईट अनुभवातून यातील प्रत्येक विद्यार्थी सफल झाला असावा. कठीण परिस्थितीवर मात करीत बारावी परीक्षेचे अध्ययन करून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली. मागील वर्षासारखीच काठीण्यपातळी असलेले बोर्डाचे पेपर होते. इंटर्नल मार्क दरवर्षीसारखेच मिळाले. विद्यार्थ्यांनी दडपण न घेता आत्मविश्वासाच्या बळावर परीक्षा दिली व स्वत:ला जणू सिद्ध केले असेच म्हणावे लागेल. बारावी बोर्ड परीक्षेचे गुण जास्त पडले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात यातून वाढ होण्यास मदत मिळेल.
विज्ञान शाखेतील करिअर : मेडिकल, अभियांत्रिकी, फार्मसी सीईटीच्या गुणांवरच प्रवेश असतात. परीक्षा लगेच द्यावी लागेल. या दोन क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रेही आहेत. शास्त्रज्ञ, प्राध्यापक असे अनेकविध करिअर आहेत. शिवाय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे स्वत:ला सिद्ध करता येईल.
केवळ पदवीवर विसंबून न राहता इतर कौशल्येही शिकायला हवीत: डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य, हिराचंद नेमचंद वाणिज्य कॉलेज
यंदा गुणांची टक्केवारी उंचावलेली आहे. इंटर्नल गुणांमुळे टक्केवारी उंचावली, असे म्हणता येणार नाही. कारण कोरोना काळापूर्वीही इंटर्नल गुण पद्धत होतीच. उलट कोविड काळातील अडचणींवर मात करीत विद्यार्थी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे गेले, असेही म्हणता येईल. पुढील करिअरचा विचार करताना केवळ एका पदवीवर विसंबून न राहता पदवीबरोबरच स्कील डेव्हलपमेंट केले पाहिजे. पूरक विषयांचे अध्ययन करीत राहिले पाहिजे. कॉमर्सच्या निकालांची टक्केवारी उंचावली असल्याने प्रवेशासाठी स्पर्धा, मेरीट असेल. सर्वांना प्रवेश मिळेल, फक्त आवडीच्या महाविद्यालयात हवा असल्यास गुणांची स्पर्धा राहील.
कॉमर्स शाखेतील करिअर : कॉमर्स शाखेतील पदवी शिक्षण्णाबरोबरच सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, सीएमए म्हणजे सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी अशा तीन व्यावसायिक पदव्या घेता येतात. याचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.