आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीमध्ये कांद्याची चोरी:लिलावानंतर कांद्याचे वजन करण्याची व्यापाऱ्यांची मागणी, वादामुळे लिलावास 3 तास विलंब

प्रतिनिधी | सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीमध्ये कांदा चोरीमुळे कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी लिलावानंतर कांद्याचे वजन करण्याची मागणी केली. त्यामुळे सोमवारी लिलावास ३ तास विलंब झाला. बाजार समिती प्रशासनाने बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी कांदा लिलावची प्रक्रिया पूर्ण झाली.

बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. सध्या दर दोन ते तीन हजारापर्यंत स्थिर असून खरेदीदारांचा प्रतिसाद ही चांगला मिळत आहे. पण कांद्याची आवक सुरू होताच चोरीच्या प्रमाणात ही वाढ होत आहे, याचा फटका थेट खरेदीदार व्यापाऱ्यांना बसत आहे. यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लिलाव झाल्यानंतर कांद्याचे वजन करावे, अशी मागणी खरेदीदार व्यापाऱ्यांनी केली. आता सध्या शेतकऱ्यांनी रात्री कांदा आणल्यानंतर त्याचे वजन लिलावापूर्वी सकाळी केले जाते, वजन केल्यापासून ते लिलाव होईपर्यंत बाजार समितीमध्ये कांद्याची चोरी होते, यामुळे आमचे नुकसान होत असल्याचे म्हणणे व्यापाऱ्यांचे आहे..

पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

बाजार समितीमध्ये होणारे गैरप्रकार कांदा चोरी रोखण्यासाठी बाजार समिती कार्यालय व आवारात बाजार समितीकडून एक कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पण हे कॅमेरे काही महिन्यातच बंद पडले. त्यामुळे कांदा चोरीचे प्रमाण वाढले याचा फटका थेट खरेदीदार कांदा व्यापाऱ्यांना बसत आहे. यामुळे लिलाव झाल्यानंतर कांद्याचे वजन करावे या मागणीसाठी खरेदीदार व्यापाऱ्यांनी लिलावात भागच घेतला नाही.

बातम्या आणखी आहेत...