आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पवारांच्या तंबीनंतर 42 कर्मचारी रुजू, सोलापूरची एसटी सेवा येतेय पूर्वपदावर; परिवहनमंत्र्यांनी दिलाय 31 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३१ मार्चनंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावर परत येणे अवघड होईल, असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या तंबीने सोलापुरात ४२ कर्मचाऱ्यांनी पुन्हा एसटी आगार गाठले आहे. यातील १५ चालक तर बाकीचे वाहक मंडळी असून, यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी गाड्यांचे प्रमाण वाढण्यासाठी उपयोग झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टीमेटमची ३१ मार्च ही तारीख जवळ येतेय म्हटल्यावर एसटी सेवा आता पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत सोलापुरात ४२ कर्मचारी कामावर हजर झाले असून, संपूर्ण सोलापूर विभागाची ही संख्या असून, चालक मोठ्या प्रमाणावर रुजू होण्याची सुरुवात झाली. यामुळे ज्या मार्गावर चालक नसल्यामुळे गाड्या बंद होत्या. त्या मार्गावर गाड्या सुरू करण्याचे प्रमाण वाढले असून, या दोन दिवसांत ज्या ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर एसटी जात होत्या. मात्र चालक नसल्यामुळे त्या थांबल्या होत्या त्या सर्व मार्गांवर एसटी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. आता दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांपैकी किती जण सेवेत येतील आणि संपाचे भवितव्य काय? हे स्पष्ट होईल.

कर्मचारी कामावर येण्याचे प्रमाण वाढले
या दोन-चार दिवसांत कर्मचारी कामावर येण्याचे प्रमाण वाढले असून, या दोन दिवसांत ४२ कर्मचारी कामावर परतले आहेत. २७ पासून बंद असलेल्या मार्गावर बऱ्यापैकी गाड्या ये-जा करत आहे. त्याचा निश्चितच प्रवाशांना फायदा होणार आहे.'' सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी

बातम्या आणखी आहेत...