आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकार सुरूच:एटीएममधून पैसे आल्यावर पाॅवर बंद करून पैसे काढण्याचा प्रकार सुरूच

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एटीएममधून पैसे ट्रान्सफर होताक्षणी पाॅवर बंद करून पैसे काढल्याच्या पुन्हा तीन घटना पुढे आल्या. एटीएम सेंटरमधून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. मागील चार महिन्यांत अशा आठ चोऱ्या झाल्या. किरण लांडगे (पेमेंट सर्व्हिसेस, व्यवस्थापक, हिताची पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड) यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे.

मार्कंडेय रुग्णालय परिसरातील एटीएममधून ३० हजार, जोडबसवण्णा चौकात ८६ हजार पाचशे, जोशी गल्ली येथून २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३६ हजार पाचशे रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राहुल खान, सलीम खान, आसिफ खान (रा. मेवात) या तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक केली. २३ पर्यंत त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.

एटीएममधील चोरीचा असा धंदा
१ एटीएममध्ये आपले स्वतःचेच कार्ड वापरतात. एटीएममधून पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर काही क्षणासाठी पावर एरर इंट्रप्शन म्हणजेच मेसेज बँकेला जाण्याआधी एटीएमचा पाॅवर सप्लाय बंद करतात. ही तांत्रिक बाब त्यांनी शिकून घेतली आहे.
२ हरियाणातील मेवात येथील असंख्य तरुण एटीएममधून पैसे काढण्याच्या बनावटगिरीत गुंतलेले आहेत, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्दी कमी असलेल्या ठिकाणी एटीएमवर ते लक्ष ठेवातात.
३ सोलापुरात मागील तीन-चार महिन्यांपासून आठ ठिकाणी सुमारे आठ ते नऊ लाख रुपये काढून घेतल्याची माहिती चौकशी समोर आली आहे. जेलरोड, एमआयडीसी पोलिस गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना वर्ग करून घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...