आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • After The Victory Of The Legislative Council, The Victory Of BJP In The City Is A Manifestation Of Dissatisfaction In The Government Deshmukh

सोलापुरात भाजपचा जल्लोष:सरकारमधील असंतोषाची प्रचिती आली; आमदार देशमुख यांचे प्रतिपादन

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे पाच आमदार निवडून आल्याने सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पेढे व लाडू वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला. ढोल व हलगीच्या तालावर आमदार देशमुखांसह कार्यकर्त्यांनी ठेका धरला.

गुलाबाची उधळण

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व सिध्द झाल्याने कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. जल्लोष करण्यासाठी आमदार देशमुख यांच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. गुलाबाच्या पाकळ्याच्या उधळण करत कार्यकर्त्यांसमवेत आ. देशमुख यांनी हलगी व ढोलच्या गजरावर ठेका धरला. यावेळी महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होेते. भाजपाचा विजय असो असे म्हणत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी शहरध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, महिला आघाडीचे इंदिरा कुडक्याल, नरेंद्र काळे, संजय कोळी, किरण देशमुख, शोभा बनशेट्टी, शिवानंद पाटील, पांडुरंग दिड्डी, राजू पाटील, शिवानंद पाटील आदी उपस्थित होेते. शहर भाजप कार्यालयात मंगळवारी दुपारी जल्लोष करण्यात आला. पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा शहरध्यक्ष विक्रम देशमुखसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षादेश मान्य

आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. हे राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत समोर आला आहे. भाजपचे पाच आमदार निवडून आल्याने आनंद झाला. पक्षाकडून आम्हाला अद्याप बोलवणे आले नाही. पक्ष जो आदेश देईल ते आम्हाला मान्य असेल.

बातम्या आणखी आहेत...