आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी यात्रा:दोन वर्षांनंतर आषाढी यात्रा, वारकऱ्यांची काळजी घ्या; अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या वर्षी कोरोना निर्बंध उठवल्याने वारीमध्ये उत्साही वातावरण आहे. अंदाजे १५ लाख वारकरी येण्याची शक्यता आहे. पंढरपुरात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याची तत्काळ कार्यवाही करावी. पालखी सोहळा, रिंगण व पालखी तळावर कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला आमदार बबन शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व १६ दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, पालखी मार्ग, विसावा आणि वारकऱ्यांचे मुक्काम ठिकाणच्या रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा. प्रत्येक विभागाला कामे नेमून द्या. स्वच्छता, शौचालय सुविधा, इतर डागडुजीकडे लक्ष द्यावे. पोलिस, आरोग्य, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने नियोजन पूर्व तयारी करावी. प्रत्येक पालख्यांचा विसावा, मुक्काम, रिंगण ठिकाण यांच्या जागेबाबतच्या अडचणी सामंजस्याने सोडवल्या जातील. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी मुरुमीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...