आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेची घंटा वाजली:सोलापूरमध्ये दोन वर्षानंतर महापालिकेच्या 58 शाळा सुरू; विद्यार्थ्यांना आणले कारमधून

सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षापासून बंद असलेली शाळा बुधवारीपासून सुरू झाली. शहरात महापालिकेतील 58 शाळेत सुमारे 5900 विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले. माजी नगरसेवक सुनील खटके आणि पालिका शिक्षक पाटील यांनी स्वताच्या कारमधून विद्यार्थ्यांना शाळेत आणले.

पहिला दिवस गोड

शासनाच्या आदेशानुसार बुधवारपासून महापालिका शाळेत विद्यार्थी येणे सुरू झाले. त्यासाठी शिक्षण मंडळाने तयार केली. प्रत्येक शाळेत विद्यार्थी स्वागत करण्यासाठी गुलाबाचे फुले, सुरुवातीचा दिवस गोड व्हावा, म्हणून लाडू वाटप, मुलावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पालिका शाळेत येणारे मुले गरीब व सामान्य कुटूंबातील असतात. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांने खबरदारी घेतली.

बैलगाडीतून आले विद्यार्थी

दमाणी नगर परिसरातील विद्यार्थ्यांना तेथील त्या परिसरातील पालिका शाळेतील शिक्षक पाटील यांनी कारमधून मुलांना आणले. माजी नगरसेवक सुनील खटके यांनी स्वतःची कार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दिली. मुलांचे स्वागत पर्यवेक्षक सुरेश कासार, तेथील शिक्षकांनी केले. काही ठिकाणी बैलगाडीतून विद्यार्थ्यांना आणल्याची माहिती पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी दिली.

पाठ्यपुस्तक दिले

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्यासाठी शासनाकडून अनुदान आले आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे, असे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी जावीर यांनी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...