आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून शिवरायांना दुधाचा अभिषेक:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल यांचा निषेध करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या निषेध व्यक्त करतज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अंदाधुंद वक्तव्य करण्याचा विकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला आहे, त्यामुळें महाराष्ट्रात सामजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केली आहे

यावेळी व्यसनमुक्ती सेलचे ज्योतिबा गुंड, निशांत सावळे, संपन्न दिवाकर, रुपेश भोसले, अक्षय जाधव, मुसा अतार, बिरप्पा बंडगर, मयूर रचा, संदीप साळुंखे, श्रवण ढवलगे, सचिन चलवादी, लखन गावडे, महेश कुलकर्णी , गणेश छत्रबंद, कुमार हलकट्टी, विशाल सावंत, यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात कोष्यारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. राज्यपालांची महाराष्ट्रातून तातडीने हकलपट्टी करा अन्यथा महाराष्ट्र पेटून मोठे असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. आंदोलकाना पोलिसांनी घेरले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सोलापूर शहरसह पंढरपूर, करमाळा, माळशिरस या तालुक्यातही राज्यपालांविरोधात आंदोलने झाली.

वाचाळवीर राज्यपालांची हाकालपट्टी करा

सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे माऊली पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांना डिलीट पदवीदान समारंभ मराठवाडा विद्यापीठामध्ये देत असताना शिवद्रोही महाराष्ट्रद्रोही राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जे उपमर्द करणारे वक्तव्य केले आहे. त्याचा मी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या पाठीवर भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ याचे अचूक ज्ञान असलेले राजे होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले होते. महापुरुषांची एलर्जी असलेल्या राज्यपाल कोशियरि यांना महाराष्ट्रातून तात्काळ हकालपट्टी करा.

बातम्या आणखी आहेत...