आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:‘अग्निपथ’विरोधात आंदोलन, कार्यकर्त्यांची धरपकड; पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अग्निपथ’ हे लष्करी सेवेतील कंत्राटीकरण असल्याचे सांगत ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’ (युवा महासंघ)ने सोमवारी पूनम गेटसमोर आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांना पोलिसांनी अडवले. दोघांमध्ये झटापट झाली. १६ जणांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन संपुष्टात आले.

महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. सचिव अनिल वासम म्हणाले, ‘‘केंद्राची ही योजना म्हणजे संरक्षण व्यवस्था आणि गोपनीयतेला तिलांजली देणारी आहे. बेरोजगार युवकांची फौजच निर्माण होईल. कोणत्याही परिस्थितीत ही योजना माघार घेतलीच पाहजिे. अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करू.’’ आंदोलनस्थळी सदर बझार पोलिस ठाण्याचा फौजफाटा होता. पूनम गेटवर केंद्राच्या विरोधात निदर्शन सुरू होती. त्याच वेळी पुतळे आणले गेले. पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळेही ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलक युवकांचीही ठाण्यात रवानगी केली. या आंदोलनात सहभागी बाळकृष्ण मल्याळ, दत्ता चव्हाण, अकील शेख, सनी कोंडा, नरेश गुलापल्ली, मधुकर चिल्लाळ, आसिफ पठाण, राहुल बुगले, मोहसीन शेख, सद्दाम बागवान, कुमार येलगेटी, नितीन माकम, योगेश आकीम, बालाजी गुंडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...