आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूजल संशोधन, व्यवस्थापन, भौगोलिक साधनांचा विकास, संशोधन करण्याची उत्तम संधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने भूगोल विषयासाठी उपलब्ध होण्यासाठी श्रीलंकेच्या कोलोम्बो येथील केलानिया विद्यापीठशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत होतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा करिअरमध्ये निश्चित फायदा होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी भारतीय उच्च आयोगाचे गोपाल बागले, केलानिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. निलांथी डिसिल्वा, कुलगुरू फडणवीस, पर्यावरणशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. विनायक धुळप, प्रा. लाल मेर्वीन धर्मासरी, प्रा. ए. जि. अमरसिंघे आणि प्रा. एम. एम. गुणथिलके आदी उपस्थित होते.
संबंध मजबूत करण्याची संधी
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसनशील राष्ट्रांमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा जागतिक भू-राजकारणावर, तसेच दक्षिण आशियातील विकसनशील देशांच्या राजकीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. गेल्या पाच दशकांच्या कालावधीत विशिष्ट देशांमध्ये दक्षिण आशियाई समाज विविध विकास धोरणे राबवित असून विकासाचे विविध स्तर गाठत आहेत.त्यांनी आचरणात आणलेली धोरणे समजून घेणे गरजेचे आहे.’’- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.