आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अहिल्यादेवी होळकर, म. फुलेंच्या‎ पूर्णाकृती पुतळ्यांसाठी उपोषण सुरू‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार हुतात्मा चौकात‎ अहिल्यादेवी होळकर आणि सुपर‎ मार्केटजवळ महात्मा जोतिबा फुले यांचे‎ पुतळे पूर्णाकृती करण्याची अनेक वर्षांची‎ मागणी आहे. महापालिका त्याकडे लक्ष‎ देत नसल्याने क्रांतिवीर किसान सेनेने‎ आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सेनेच्या‎ वतीने गुरुवारपासून महापालिकेसमोर‎ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. या‎ आंदोलनात करणराजे गडदे, शेखर‎ बंगाळे, डी. डी. पांढरे आदी सहभागी‎ आहेत. महापलिकेच्या वतीने चार हुतात्मा‎ पुतळा परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे.‎ तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा‎ अर्धपुतळा आहे. तो पुतळा पूर्णाकृती‎ करण्याची मागणी आहे. तसेच थोर‎ समाजसुधारक महात्मा फुले यांचाही‎ अर्धपुतळा आहे. तोही पूर्णाकृती‎ करण्याची मागणी क्रांतिवीर किसान‎ सेनेची आहे.‎

बातम्या आणखी आहेत...