आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले संम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित करण्यास जैन समाजाचा विरोध आहे. समाजबाधवांनी काही मुद्दे केंद्रापुढे ठेवले आहेत. त्यावर चर्चा सुरु आहे. हा संवेदनशील विषय असल्याने त्यावर केंद्र सरकार काम करत आहे. झारखंड व केंद्र सरकार यांचे वेगळे अस्तित्व आहे. केंद्र सरकार आपले काम करत आहे असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले. ते सोलापूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी संवाद साधनाता ते बोलत होते.
मिशन 48 ही होईल पण हळुहळू
महाराष्ट्रात आगामी काळात भाजपा मिशन 45 घेऊन काम करत असून, हळूहळू ते मिशन 48 पर्यंत जाईल. त्यानुसार, आम्ही महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदार संघात दौरा करत आहोत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादांचा विषय 50 वर्षापासून असून, आम्ही केंद्रातील सरकारने यात लक्ष घालून बैठक घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सर्वकाही सांगितले आहे. त्यामुळे यापुढे वाद होण्यापेक्षा समाधान होईल.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद
महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद 509 वर्षापासून असून, त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. सर्वकाही समाधान होईल. आता वाद होणार नाहीत असे गृहराज्यमंत्री मिश्रा म्हणाले.
जैन समाजाच्या भावनेचा केंद्राने दखल घेतली
झारखंडमधील संम्मेदशिखरजीस पर्यटन स्थळास जैन समाजाचा विरोध आहे. त्यावर बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा म्हणाले, जैन समाज हा योगदान देणारा समाज असून, त्यांनी संम्मेदशिखरजी बाबत मुद्दे केंद्रापुढे ठेवले आहे. झारखंड व केंद्र सरकार यांचे अस्तित्व वेगवेगळे आहे. जैन समाजाची भावना पाहता केंद्राने यात लक्ष घातले असून, हा संवेदनशील विषय आहे. केंद्र सरकार यात लक्ष घातला आहे. चर्चा सुरु आहे. केंद्र सरकार काम करत असून, यांचे लवकरच निराकरण होईल असे मिश्रा म्हणाले असले तरी केंद्र सरकार काय निर्णय घेईल ते येथे सांगणे योग्य होणार नाही असे ते म्हणाले.
राहुल गांधींकडे पुरावा नाही
पुराव्याच्या आधारावर राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बाबतीत वाक्य केले याच्यावर आपली काय प्रतिक्रिया असे विचारले असता केंद्रीय राज्य गृहमंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले अनावश्यक पुराव्याच्या आधारावर राहुल गांधी हे बोलत आहेत असं वक्तव्य यावेळी केल. चीन आमच्यावर कब्जा करत आहे हे खोट बोलले. इतिहासाचे पुर्नलेखन होईल. समान नागरी कायदासारखे वातावरण पुढील काळात दिसू लागेल असे मिश्रा म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.