आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. मी एकटाच असल्याने, काजळीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पथक कुठून करणार? मी स्वत: दोन दिवसांपासून शहरातून मोटार सायकलवरून फिरतोय, रस्त्यांची काम सुरू असून, वाहतुकीच्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळेही काही अडचणी असू शकतील काय? याबाबतचा आढावा घेण्यात येतोय, असा नवा जावईशोध काजळीच्या कारणांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक अजितकुमार पाटील यांनी लावला.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांमध्ये काजळी पसरत आहे. अनेकांच्या घराच्या छतावर, अपार्टमेंटमधील गॅलरीसह, वाळवण्यासाठी घातलेल्या कपड्यांवर पसरत असल्याने सोलापूरकर त्रस्त झालेत. त्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेऊन कारवाई करण्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक पाटील यांना मागील काही दिवसांपासून कार्यालयात वारंवार जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. पण, बैठकीच्या निमित्ताने बाहेर असल्याची कारणं कार्यालयात सांगण्यात आली.
त्यांचा मोबाइल सतत बंदच होता. त्यामुळे चार दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी शंकर वाघमारे यांना मोबाइलवरून संपर्क साधला असता, तुमच्याकडून सोलापूर शहरात काजळी परसरत असल्याचे समजले असून त्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील. चार-पाच दिवसांचा कालावधी लागेल, असे सांगितले होते. क्षेत्रीय अधिकारी वाघमारे यांच्या सांगण्यानुसार चार दिवसांचा कालावधी संपतोय. पण, अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळास काजळीच्या कारणांचा शोध लागला नाही. शहरातील हवेच्या प्रदूषणात किती वाढ झाली काय? असल्यास त्यामध्ये काजळीचे प्रमाण किती? याबाबतची माहिती सांगण्याची तसदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली नाही.
कार्यालयात कर्मचारीच नाहीत, कारणांचा जुनाच पाढा कार्यालयात कर्मचारी नाहीत, संपूर्ण जिल्ह्याचा कारभार मोठा आहे? कारखाने सुरू आहेत? शासनाला माहिती पाठविणे, परिपत्रकांची अंमलबजावणीची काम मोठी असून माहिती अधिकाराच्या तक्रारी सतत असतात? काजळीच्या कारणांचा शोध घेणे, त्याबाबत तांत्रिक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी कार्यालयात कर्मचारी नाहीत, अशा कारणांचा पाढाच उपसंचालक पाटील यांनी वाचला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.