आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकोट रस्त्यावर खासगी बसचा अपघात:बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली, बस चालकाचा मृत्यू तर 6 जण जखमी

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने येणारी खाजगी प्रवासी वाहतूक बस लिंबीचिंचोळी उड्डाणपूलावरती उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार, तर सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमाराला घडला.

मोहम्मद नासिर अहमद ( वय 53, रा. गुलबर्गा) या बसचालकाचा मृत्यू झाला आहे. निंगम्मा मल्लय्या पुजारी ( वय 54, रायचूर), रुकय्याबेगम म. गफूर वेग ( वय 77, मुंबई), अमरीश कोडी ( वय 37, चिंचोळी, गुलबर्गा ), सतीश कुमार ( वय 35, गोरमेटकल, यादगीर), आप्पाराव कटरे ( वय 65, खजूरगी, आळंद), अनिल राठोड ( वय 22 होळीताळ तांडा, शहापूर यादगीर ) हे सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, खाजगी बस ( केए 01 एएम 0510) ही बस अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने येत होती. लिंबीचिंचोळी पुलावरती आल्यानंतर बस दुभाजकाला ठोकरल्यामुळे पूर्णपणे उलटली यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमींना वळसंग पोलिस आणि महामार्ग मदत केंद्र विभागाने खाजगी वाहनातून उपचाराला दाखल केले. यानंतर दुपारी उशिरापर्यंत क्रेनच्या साह्याने बस पुन्हा रस्त्यावरून हटवण्यात आली आहे. पहाटेच्या सुमाराला अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. खाजगी बस मधील काही प्रवासी गुलबर्गा व अक्कलकोट येथे दर्शन घेऊन पुन्हा सोलापूरच्या दिशेने पुणे येत होते. हा अपघात इतका भीषण होता की भरधाव वेगात दुभाजकावर बस आल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस पलटी झाली आहे. जखमीच्या नातेवाईकांना संपर्क करून पोलिसांनी माहिती दिली. सहाजणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत आहे. वळसंग पोलीस आणखी या घटनेचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...