आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील अक्कलकोट, सोलापूरसारख्या शहरांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक राहत आहेत. आता ते महाराष्ट्राचे अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे ही शहरे राज्याचाच अविभाज्य भाग असतील, असे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गाे-हे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.
महाराष्ट्रातील अक्कलकोट, सोलापूर शहरांसह काही गावांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बाेम्मई यांनी केली आहे. त्यांच्या विधानाचा निषेध डॉ. निलम गोऱ्हे यांनी केला आहे.
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर आपली प्रतिक्रिया देताना डॉ. गाे-हे म्हणाल्या, न्यायालयात सीमा प्रश्नावर सुरू असलेली सुनावणी आता ऐरणीवर आली असताना स्वत:ची लंगडी बाजू लपवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अशी उलट सुलट विधाने करून जनतेची दिशाभूल करणे, ही केंद्र सरकारच्या कामाची पद्धत कर्नाटक सरकारने अवलंबल्याचे दिसून येत आहे. असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे, असा आरोपही डॉ. निलम गोऱ्हे यांनी केला.
पाकप्रमाणेच कर्नाटकचा दावा
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भारतातील काही भागांबाबत पाकिस्तानही असाच दावा करतो. हा पाकिस्तानचाच भाग आहे, असे तेथील सरकार ज्याप्रमाणे म्हणते, त्याचप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री आता वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्राने वेळीच कर्नाटक सरकारला चाप लावावा, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
केंद्राकडून केवळ राजकारण
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, केंद्र सरकार काही करणार नसेल तर महाराष्ट्र सरकारच प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. या प्रश्नावर केंद्र सरकार दोन्ही हातात लोण्याचा गोळा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एका बाजूला कर्नाटक सरकारमधील जनतेची मते मिळवायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेलादेखील बेळगाव तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सांगून काहीतरी आश्वासने द्यायची. या विषयावर केंद्र केवळ राजकारण करत आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांनी पुर्वी ठराव केल्याचा दावा करीत ही गावे कर्नाटकात यायला उच्छुक असल्याची प्रतिक्रिया कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली हाेती. त्यानंतर आज त्यांनी साेलापूर, अक्कलकाेट शहरे कर्नाटकात येतील असा दावा केला आहे. त्याचे तीव्र पडसाद साेलापूरसह राज्यात उमटू लागले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे थांबवावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.