आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलावे ते आम्हीच:अकलूजला महर्षी राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा ; जाधव, टेकाडे, पाटील, भोसले प्रथम

अकलूज22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महर्षी राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गट १ मध्ये स्नेहल जानकर (सांगोला), सायली जाधव (निमगाव), राजनंदिनी गायकवाड (अकलूज), शालेय गट २ मध्ये पृथ्वीराज जाधव (भाळवणी), आदित्य टेकाडे (बीड) यांनी तर खुल्या गटात संकेत पाटील (पुणे) व उदयनराजे भोसले (मंगळवेढा) यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला. शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे सातवे वर्ष होते. या स्पर्धेचे उद्घाटन सिनेअभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्र. प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे, समन्वयक डॉ. हनुमंत आवताडे, स्पर्धा प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड, समन्वयक डॉ. अपर्णा कुचेकर, डॉ. चंकेश्वर लोंढे, दत्तात्रय मगर, डॉ. अण्णासाहेब नलावडे, डॉ. सज्जन पवार, प्रा. स्मिता पाटील, प्रा . अनिल पराडे, प्रा. विनायक माने, युवराज मालुसरे यांच्यासह सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. या स्पर्धेकरिता डॉ. जनार्दन परकाळे, प्रा. अक्षय लावंड, प्रा. रवींद्र नागटिळक, डॉ. विशाल साळुंखे, प्रा. रोहित देशमुख, प्रा. नानासाहेब गव्हाणे, प्रा. समाधान काळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...