आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमवारी जाहीर:साेलापूर बाजार समितीला अकलूज, दुधनी पडले भारी ; राज्यात अकलूज 20 वे तर साेलापूर 22 वे

साेलापूर / विठ्ठल सुतारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०० बाजार समित्यांची क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज व इतर निकषाच्या आधारे उपनिबंधकाच्या वतीने मूल्यांकन करण्यात आले.

यामध्ये अकलूज बाजार समिती राज्यात २० व्या, दुधनी २१ व्या तर एका दिवसात १ लाख क्विंटल कांद्याची आवक होणाऱ्या सोलापूर बाजार समितीचा राज्यात २२ वा क्रमांक आहे. राज्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती १६३ गुण घेऊन राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

३०० बाजार समित्यांचा समावेश, बार्शी २५ वा क्रमांक एका दिवसात १ लाखाहून अधिक क्विंटल कांद्याची आवक होणाऱ्या सोलापूर बाजार समिती सहकार विभागाने केलेल्या पाहणीमध्ये मात्र फेल झाली आहे. पायाभूत सुविधेसाठी ६१.५०, आर्थिक कामकाजासाठी २४.५० तर वैधनिक कामकाज ३० टक्के समाधान व्यक्त करण्यात आले आहे. सोलापूरपेक्षाही अकलूज व दुधनीला अधिक गुण मिळाले आहेत. बार्शी बाजार समितीला १३४.५० गुण मिळाले असून राज्यात २५ व्या क्रमांकावर गेली आहे. पंढरपूर ३१ व्या, मंगळवेढा ६९ तर कुर्डुवाडी ७० व्या क्रमांकावर आहे.

३५ निकषांवर उपनिबंधक यांच्याकडून पाहणीद्वारे गुण
राज्यात पहिल्याच वेळी बाजार समितीमधील सुविधांची पाहणी करून क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री व्यवस्थापनामध्ये बाजार समितीत असलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज यासह इतर ३५ निकष लावून गुण देण्यात आले आहेत. तालुका उपनिबंधकांकडून पाहणी करून २०० पैकी गुण देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...