आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेतेपद:राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या आकृती सोनकुसरेला तिहेरी मुकुट

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय सुपर सिरीज लॉन टेनिस स्पर्धेत येथील आकृती सोनकुसरे हिने १६, १८ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत आणि दुहेरीत विजेतेपद पटकावित तिहेरी मुकुट संपदिला.

अंतिम सामन्यात १६ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत तिने उत्तरप्रदेश गोरखपुरच्या शगुन कुमारीला ६-३, ६-३ असे हरविले. १८ वर्षाखालील गटात तिने ओरिसाच्या आराध्य वर्मा हिस ६-३, ६-० असे नमविले. दुहेरीत तिने गोरखपुरच्या शगुन कुमारीच्या साथीत प्रशंसा श्रीवास्तव व परी सिंग या बिहारच्या जोडीवर ६-१,४-६ नंतर टाय ब्रेकमध्ये १०-१ असे पराभूत केले. तिचे जिल्हा संघटनेचे सचिव राजीव देसाई यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...