आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोलापूरच्या अक्षयला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान; फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रुद्रा फॉरगोटन द वर्ल्ड फिल्मचा गौरव

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोलापूरच्या अक्षय चव्हाण यास "रुद्रा फॉरगोटन द वर्ल्ड " या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार जाहीर केले. भारतातील सर्व प्रसिद्ध असणाऱ्या ग्रीन गोल्ड या ॲनिमेशन स्टुडिओत काम करणाऱ्या अक्षयने सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने सोनेरी तुरा खोवला आहे.

लिटिल फ्लावर शाळेतून माध्यमिक शिक्षण घेऊन औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालयातून फाइन आर्ट क्षेत्रातील पदवी त्याने घेतली. तेथून कला क्षेत्रात पाय रोवून अक्षय सध्या भारतातील एका प्रतिथयश असा दिग्दर्शक म्हणून सर्वपरिचित आहे. त्याने आजवर प्रसिद्ध कार्टून वाहिनीसाठी काम केले आहे. त्याच्या या प्रवासात त्याचे वडील कै. संजीव यांनी कायम भरीव सहयोग दिला. आई संगीता आणि पत्नी प्रांजल हिने कायम खंबीरपणे सोबत केली. लहानपणापासून वडिलांच्या फर्निचरच्या व्यवसायात मदत केली. वडिलांनी तुला जे क्षेत्र आवडते, त्या क्षेत्रात काम कर अशी थाप दिल्याने तिथूनच त्याचा खरा प्रवास सुरू झाला.

‘किसा गौतमी’ला एक्सलन्स अॅवार्ड
याच महोत्सवात महाकरुणिक प्रॉडक्शनच्या रवी गजधाने यानी दिग्दर्शित केलेल्या सृष्टी कसबे यांनी निर्मित किसा गौतमी या लघुपटाला एक्सलन्स फिल्म अवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी दोन पुरस्कार सोलापूरच्या नावे प्राप्त झाले आहेत. तथागत बुध्दांची भूमिका डॉ.औदुंबर मस्के यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...