आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​गणेशोत्सव विशेष:आले बाप्पा, आतूर भक्त अन् विलोभनीय मूर्ती ; भक्तांच्या गर्दीने फुलल्या

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता दोनच दिवसांनी लाडक्या बाप्पांचे घरोघरी आगमन होईल. भक्तांच्या हाती देण्यासाठी विलोभनीय मूर्ती बाजारात दाखल झालेल्या आहेत. आजोबा आणि नातवंडांच्या सहली बाप्पांना पाहायला निघाल्या. त्यांच्या भिरभरणाऱ्या नजरेतून मूर्तींची पूर्वनोंदणी सुरू झाली. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी व्यापारपेठा सज्ज झाल्या. सजावटीच्या साहित्याने उजळून गेल्या. मोदकांच्या घमघमाटाने हलवाई गल्ली मोहरून गेली आहे. बाळीवेस ते मधला मारुती परिसर भक्तांनी फुलून गेले. त्यातच गौरीचे मुखवटेही आले. मनसोक्त खरेदीसाठी भक्तमंडळी बाहेर पडली. त्यामुळे व्यापारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दोन लाख गणेशमूर्ती
मूर्तिकार बांधवांनी यंदा दोन लाख गणेशमूर्ती तयार केल्या. अतिशय वैविध्यपूर्ण आणि विलोभनीय अशा या मूर्ती बनल्या. पेण, अहमदनगर येथूनही व्यापाऱ्यांनी मूर्ती आणल्या. परंतु सोलापूरच्या मूर्तिकारांनी त्यांच्या तुलनेत अधिक सुंदर, सुबक आणि स्वस्तदरात मूर्ती देण्यास सुरुवात केली. बहुतांश मूर्तिकारांच्या गोदामातील निम्म्या मूर्तींची आगाऊ नोंदणी झाली.

पर्यावरणपूरक उत्सव
पीओपीच्या मूर्ती मुबलक असल्या तरी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे मातीच्या मूर्तींनाही मागणी वाढली. या मूर्तींसाठी स्वतंत्र स्टॉल तयार आहेत. माणिक चौक, बाळीवेस, न्यू पाच्छा पेठ, कुंभार गल्ली आदी ठिकाणी मातीच्याही मूर्ती मिळतील. त्यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.

भक्तांच्या गर्दीने फुलल्या

गणपती ही बुद्धिदेवता आहे. त्याच्या रचनेतील आशय असा- मोठे डोके : मोठा विचार करण्यासाठी. मोठे कान : काळजीपूर्वक ऐकण्यासाठी. लहान डोळे : लक्ष केंद्रित करण्यासाठी. लहान तोंड : कमी बोलण्यासाठी. एक दात : चांगुलपणा टिकवण्यासाठी. लांब सोंड : जुळवून घेण्यासाठी आणि मोठे पोट : चांगले आणि वाईट पचवण्यासाठी.’’ पंडित वेणूगाेपाल जिल्ला, साेलापूर

बातम्या आणखी आहेत...