आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आतडी बाहेर आल्याचा आरोप ; आरोग्य केंद्रातील प्रकार

मंगळवेढा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोसे (ता. मंगळवेढा) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या त्रुटीमुळे टाके काढल्यानंतर महिलेच्या पोटातील आतडी बाहेर पडली, असा आरोप करत महिलेच्या पतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोशींवर कारवाई करण्याची मागणी सिव्हिल पोलिस चौकीत केली आहे.

भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खडकी येथील पल्लवी शंकर घोगरे याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया १९ ऑगस्ट रोजी झाली. टाके काढून त्याना २५ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज देण्यात आले. त्यानंतर काही वेळातच पोटातील आतडी बाहेर पडल्यामुळे रूग्णाच्या पतीने फोनवर भोसे आरोग्य केंद्रात माहिती दिली. तासानंतर आरोग्यसेविका सखुबाई घाडगे खडकी येथे येऊन सदर महिलेला मंगळवेढा येथे खासगी वाहनात घेऊन गेली. ज्या डॉक्टरांनी भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केली होती, त्यांच्याच मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला. गुरुवारी रात्री उशिरा मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पाठवण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत उपचारात टाळाटाळ झाली. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हादऱ्यामुळे त्रास होणे शक्य
शस्त्रक्रियेनंतर ७ ते ८ दिवसांनी महिलेला त्रास झाला आहे. पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्राथमिक माहितीनुसार शस्त्रक्रियेत चूक झाल्याचे दिसून येत नाही. रस्त्यावरील खड्ड्याचे हादरे बसून किंवा जोरदार खोकल्यामुळे, जास्त वजन उचलल्याने टाके ओले असल्यामुळे काही महिलांना त्रास होऊ शकतो.””
डॉ. भाऊसाहेब जानकर, तालुका वैद्यकीय अधिकारी

काळजी न घेतल्याने प्रकार
सदरच्या महिलेची शस्त्रक्रिया ही मी स्वतः केली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर वजन उचलल्याने पोटाला ताण पडल्यावर टाके तुटू शकतात. शस्त्रक्रिया केल्यानंतर सात ते आठ दिवसांनी टाके तोडण्यासाठी ती महिला आली होती. टाके तोडल्यानंतर योग्य ती काळजी घेतली नसल्याने हा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान कुठलिही चूक झाली नव्हती.
डॉ. नंदकुमार शिंदे, अधिकारी प्राथमिक, आरोग्य केंद्र भोसे

बातम्या आणखी आहेत...