आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात्यांचे वाटप:महापालिका अधिकाऱ्यांना नव्याने खात्यांचे वाटप

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील कामे करण्यास सोयीचे ठरावे म्हणून महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी नव्याने खाते वाटप केले. संदीप कारंजे यांना अतिरिक्त पदावर पदोन्नतीनंतर कामाची विभागणी करण्यात आली. कारंजे हे तांत्रिक अधिकारी असल्याने त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा पदभार देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त हे पद प्रशासकीय असल्याने खाते देण्यात आले.

गरज पडल्यास पुन्हा बदल करणार असल्याचे आयुक्त तेली-उगले यांनी स्पष्ट केले.श्री. कारंजे यांनी रस्ते कामात विशेष शिक्षण प्राप्त केले आहे. असे असताना रस्ते कामाचा अतिरिक्त आयुक्तांचा पदभार विजय खोराटे यांच्याकडे देण्यात आला. याशिवाय नगर रचना व बांधकाम परवाना त्यांच्याकडे कायम राहतील.

कारंजे यांच्याकडे पाणीपुरवठा, ड्रेेनेज, विद्युत विभाग, नगर सचिव, संगणक, विधी, प्राणिसंग्रहालय व पशुवैद्यकीय. खोराटे यांच्याकडे शहर सुधारणा, प्रकल्प, नगर रचना व बांधकाम, मुख्य लेखापाल, सामान्य प्रशासन, वाहन, निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन. उपायुक्त घोलप यांच्याकडे १० तर विद्या पोळ यांच्याकडे ११ विभाग असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...