आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सरणाला पर्याय आता जौविक चकत्यांचा, एका अग्निसंस्कारासाठी लागतात दोन झाडांची लाकडे

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अग्निसंस्काराकरिता साधारण ३५० ते ४०० किलो लाकडाची गरज असते

एका मृतदेहाच्या अग्निसंस्काराकरिता साधारण ३५० ते ४०० किलो लाकडाची गरज असते. दोन झाडे तोडल्यानंतर इतके लाकूड मिळू शकते. अर्थात पर्यावरणाचा कायमस्वरूपी ऱ्हास करूनच ते मिळते. आता अग्निसंस्कारासाठी वृक्ष तोडीला एक पर्याय उपलब्ध झाला आहे. अग्निसंस्कारासाठी जैविक चकत्यांचा वापर करता येतो. हिंदू धर्म हा काळानुरूप योग्य बदल स्वीकारणारा असल्यामुळे या बदलासाठी प्रशासकीय स्तरावरून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

नागपूर शहरामध्ये गेल्या दोन वर्षांपासून अंत्यविधीसाठी जैविक चकत्या वापरण्यात येतात. यासाठी तेथील विजय लिमये यांनी अभ्यासपूर्वक संशोधन करून जैविक चकत्यांबाबत महानगरपालिकेस सरणाला पर्याय जौविक चकत्यांचामार्गदर्शन केले. महापालिकेनेही यासाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी थोडा वेळ लागला. पण झाडे वाचवण्याचे महत्त्व पटल्यानंतर नागरिकांनीही पुढाकार घेतल्याचे दिसले. परिणामी एका नागपूर शहरातील अग्निसंस्कारातील जैविक चकत्यांच्या वापराने तब्बल ३६ हजार वृक्ष वाचवले गेले आहेत.जैविक चकत्या वापरल्याने एका पार्थिवाच्या अग्निसंस्कारासाठी ३५० ते ४०० किलो लाकडाच्या जागी २५० किलो चकत्या लागतात. किंवा आपण गोवऱ्या आणि जैविक चकत्या एकत्र करूनही वापरू शकतो. या नावीन्यपूर्ण चकत्यांचा वापर करून १८ हजार पार्थिवांवर अग्निसंस्कार करण्यात आले. श्री. लिमये यांनी सांगितल्यानुसार जैविक चकती ६.५० रुपये प्रतिकिलो तर गोवऱ्या १० रुपये प्रतिकिलो या दराने मिळतात. लाकडात ४० टक्के आेलसरपणा असतो. त्यामुळे त्याचे वजन वाढते. जळण क्षमता कमी हाेते.

यापासून बनवतात जैविक चकत्या
जैविक चकत्या बनवण्याच्या प्रक्रियेत दोन भाग समाविष्ट आहेत, एक म्हणजे सर्व जैविक घटक कॉम्प्रेस करणे व दुसरा म्हणजे वापर होईपर्यंत चकत्या दबलेल्या अवस्थेतच राहतील, यासाठी त्यामध्ये लिग्निनसारखे बाइंडर्स वापरता येतात. प्रामुख्याने धान्याची रास झाल्यावर जी टरफले राहतात, पालापाचोळा राहतो. झाडांची वाळलेली पाने, नारळाच्या करवंट्या, उसाचे पाचट, वाळलेली पाने इत्यादी अनेक गोष्टींपासून या चकत्या बनवता येतात.

सोलापुरातही अभियंत्यांसाठी संधी
जैविक चकत्या सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असतात. नागपूरपाठोपाठ गोवा, मुंबई या ठिकाणीसुद्धा जैविक चकत्यांचा अंत्यसंस्कारासाठी वापर सुरू झाला आहे. ज्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या चकत्या बनवणारे उद्योग नसतील तेथे चालू कारण्यासाठी तरुण अभियंत्यांना चांगली संधी आहे. सोलापूरसारख्या शहरातही अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण पुढाकाराची गरज आहे. '' प्रा. डॉ. श्रीकांत जहागीरदार, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय

ग्रामीण भागातही करता येईल वापर
दुसऱ्या लाटेमध्ये सापडलेल्या प्रत्येक शहरात मृतांच्या अग्निसंस्कारासाठी रांगा दिसत आहेत. सलग होणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे विद्युत दाहिन्यांवरही ताण येत आहे. एके ठिकाणी तर सलग २४ तास विद्युत दाहिनी चालू ठेवल्यामुळे दाहिनीची चिमणी वितळून दाहिनी बंद पडली. ज्या शहरात अथवा गावात विद्युतदाहिनी नाही, अशा ठिकाणी लाकडांना पर्याय नाहीच. त्यावरचा उपाय म्हणजे जैविक चकत्या.

बातम्या आणखी आहेत...