आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची मालट्रकला जोराची धडक; भीषण अपघातात 3 जण ठार तर 10 जखमी

मोहोळ । भारत नाईक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची मालट्रकला पाठीमागून जोराची धडक

पुण्याहून तेलंगणा येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने मालट्रकला पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य 10 जण जण गंभीर झाल्याची घटना पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास मोहोळ येथील अपघात झोन असलेल्या कन्या प्रशाला चौकात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या सुकट्या नुरयॉ खतरावत यांचे अपघातामुळे निधन झाले. त्याचा मृतदेह तेलंगणा येथे घेऊन त्यांचे नातेवाईक पुण्याहुन क्र. एम.एच .12 आर.एन. 6387 या रुग्णवाहिकेतून तेलगंणा (आंध्र प्रदेश) येथे निघाले होते. पहाटे तीनच्या सुमारास मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकात पुण्याहून हैदराबादला चाललेल्या मालट्रक क्र. एम.एच.43, बी.जी. 4500 ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने रुग्णवाहिका चालकासह इतर दोन गंभीर व रुग्णवाहिकेतील इतर 11 जण जखमी आहेत. यातील रामलु धनसिंग राठोड (वय 45), रामलु सोमनाथ राठोड, आशा सुभाष राठोड(वय 40), लोकेश धनसिंग राठोड(वय 39) , किसन रामलु राठोड (वय 39), निलेश भानु पवार(वय 30), किसन नारायण राठोड(वय 40), असलीबाई किसन राठोड(वय 38) व अन्य दोन जणांवर सर्व रा. वारजेवाडी पुणे आदींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर, अपघात पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल अविनाश शिंदे, सावळेश्वर टोल नाक्याचे कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना इतर तीन रुग्णवाहीकाच्या मदतीने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविले. यात उपचारापूर्वीच रवि माणिक राठोड (वय 38 रा. वारजेवाडी जि.पुणे), बुध्दीबाई चन्ना पालत्या(वय 48) व अन्य एकाचे निधन झाले होते. तर उपचारादरम्यान अन्य एकाचे निधन झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या अपघाताची नोंद सोलापूर येथील शासकीय रुग्णालय पोलिस चौकीत दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...