आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा:जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यु

माढा / संदीप शिंदे|एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची घटना माढा तालुक्यातील वडाचीवाडी(उ.बु) येथे घडली आहे.रोहन सिद्धेश्र्वर निळे(वय ११ रा.वडाचीवाडी(उ.बु) ता.माढा असं मृत्यु झालेल्या त्या बालकाचे नाव आहे.

माढा ग्रामीण रुग्णालयात रोहन यास गुरुवार दि ११ रोजी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान उपचारासाठी आणण्यात आले होते. वैद्यकिय अधिक्षक डाॅ.सदानंद व्हनकळस यांनी रोहन चा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले.

रोहनच्या नातेवाईकांकडून मिळालेली अधिक माहिति अशी की,रोहन हा पायाने दिव्यांग होता.त्याने गुरुवारी दुपारी शाबुदाणा खाल्ला होता.त्यास अधिक त्रास वाटु लागल्याने त्याला माढ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.

त्याच्या पश्चात आई, वडील,एक भाऊ,आजी,आजोबा,चुलते,चुलती असा परिवार आहे.माढा ग्रामीण रुग्णालयात रोहनचे शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेची ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने माढा पोलिसांत नोंद देण्यात आली आहे.

रोहन च्या श्वासनलिकेत अन्नाचा घास अडकल्याने त्याला गुदमरून आले.आणी त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.रोहनला झटका येत होता असे नातेवाईकांनी आम्हाला माहिती दिली आहे - डाॅ.सदानंद व्हनकळस,वैद्यकिय अधिक्षक माढा ग्रामीण रुग्णालय

बातम्या आणखी आहेत...