आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:इंटरव्ह्यूसाठी जाताना अपघात; तरुण जखमी

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे इंटरव्ह्यू देण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवर जात असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा उजवा पाय फॅक्चर होऊन तो जखमी झाला. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश चिट्टमपल्ली (वय २६) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रथमेश हा पुणे येथील खासगी कंपनी इंटरव्ह्यूसाठी बोलवले होते.

त्यामुळे प्रथमेश हा रामचंद्र देविदास चिट्टमपल्ली (वय ५३, रा. श्रीशैल नगर, शेळगी) यांच्या दुचाकीवरून (एम एच १३, सी पी ६१०१) पुण्याला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे निघाला हाेता. तेव्हा दुचाकीवरुन जात असताना जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे आला असता समाेरून आलेल्या एम एच १३, ए आर ५८३५ या दुचाकीने प्रथमेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ताे गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...