आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावरून भाजप मैदानात:सोलापूरबाबत दुजाभावाचा आरोप करत 2 खासदार अन् 8 आमदारांचे आंदोलन

सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करताना भाजपचे आमदार आणि खासदार. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करताना भाजपचे आमदार आणि खासदार.
  • प्रमाणात औषधे न मिळाल्यास न्यायालयात जाणार

कोरोना संसर्गाचा सोलापूर शहर आणि जिल्ह्याला विळखा पडलेला असताना रेमडेसिविर आणि आॅक्सिजन पुरवठ्याबाबत सोलापूरला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत गुरुवारी भाजपचे दोन खासदार आणि आठ आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. रुग्णांच्या प्रमाणात औषधे पुरवली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या आंदोलनावर टीका केली. नौटंकी करू नका, कृतीशील सहभाग नोंदवा असे ते म्हणाले.

जिल्ह्याला मागील महिनाभरात फक्त १२ हजार रेमेडेसिविर इंजेक्शन्स प्राप्त झाले. रुग्णांच्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. इतर जिल्ह्याला सोलापूरच्या वाट्याला आलेली औषधे दिली जातात. लसही लोकसंख्येच्या प्रमाणात प्राप्त होत नाही. राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. पालकमंत्री भरणे यांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे, असा आरोप भाजपच्या खासदार व आमदारांनी केला. जिल्ह्याला औषध नाही मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला.

यांचा होता सहभाग
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, धैर्यशील मोहिते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
बसवेश्वरांच्या विचारकार्याचे प्रभेदकत्व अन् प्रप्रथमत्त्व
निगडित हाेते. अनुभव मंटप ही बहुजन समाज संघटनेची जणू एक प्रतिकृतीच हाेय. स्वातंत्र्य, समता अाणि बंधुता ही लाेकशाहीच्या मूलभूत त्रिसूत्री शासन पद्धती बसवेश्वरांनी राबवली. ते वैश्विक लाेकशाही शासन प्रणालीचे जनक हाेत.

बसवेश्वर हे धर्मसमानतेचे अाणि एकूणच सम्यक सामाजिक समतेचे एक वैश्विक प्रारूप आहे. त्यांनी ११६७ च्या दरम्यान कल्याण राज्यामध्ये ब्राह्मण वधू लावण्यवती अाणि चांभार वर शीलवंत यांच्यातील अांतरजातीय विवाहसंबंधाला मान्यता देऊन त्याचा पुरस्कार केला. भारतीय समाजातील हा पहिला एेतिहासिक अांतरजातीय विवाह हाेय.

‘दया हेचि धर्माचे मूळ’ असे बसवेश्वरांनी म्हटले हाेते. देव, मंदिर, मूर्ती, प्रार्थना अशा काेणत्याही गाेष्टीपेक्षा त्यांनी केवळ दयाभावनेला अनन्यमहत्त्व दिले अाहे. दयेविना इतर काेणतीही गाेष्ट बसवेश्वरांनी व्यर्थ मानली अाहे. दयेकडून दासाेहाकडे, दासाेहाकडून सहकार्याकडे अाणि सहकार्यातून समृद्धीकडे जाण्याचा जणू राजमार्ग त्यांनी सांगितला अाहे.

‘देह हेचि देवालय’ या विचाराचे त्यांनी समर्थन केले अाहे. ज्यांनी देवसंकल्पना स्वीकारली, मात्र मंदिर अाणि पाैराेहित्य महात्म्य स्पष्टपणे नाकारले, विश्वाकारी इष्टलिंग स्वरूपातील शिवपरमात्मा स्त्री तसेच पुरुष या दाेघांच्या हृदयांवर सदैव धारण करण्याची संकल्पना, संस्कार, दीक्षा, प्रथा अाणि चळवळ ही प्रथमत: महात्मा बसेवश्वरांनी सुरू केली. ‘लिंगायत म्हणजे इष्टलिंग अाणि इष्टलिंग म्हणजे बसवेश्वर’ असे जणू समीकरणच जनमानसात रूढ झाले. बसवेश्वरांनी नित्य धारण करावयाच्या इष्टलिंग स्वरूपातीलच शिवाेपासना स्वीकारली अाणि पुरस्कारली अाहे. या इष्टलिंग संस्कृतीच्या पार्श्वभूमीवरच बसवेश्वरांना लिंगायत धर्मप्रेषित म्हटले अाहे.

सर्व काही सुरळीत सुरू
मागणीनुसार रेमडेसिविर प्राप्त होत आहे. डॉक्टरांच्या शिफारशीनुसार प्रत्येक रुग्णालयांना रोज इंजेक्शन पुरवत आहे. ऑक्सिजनची मागणी परिपूर्ण आहे. कोणत्याही रुग्णालयास ऑक्सिजन कमी पडू दिला जात नाही. आॅक्सिजन कमी येत असला तरी कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. शासनाच्या नियोजनानुसार सोलापूर जिल्ह्याला लस दिली जात आहे. त्यामुळे रुग्णावर वेळेत उपचार करणे व त्यांचा जीव वाचवणे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.'' मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

रुग्णसंख्येच्या केवळ २८ % इंजेक्शन मिळाले, इतरत्र हे प्रमाण ४० %
पक्षीय राजकारण होत असल्याचा पालकमंत्र्यांचा आरोप जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा जीवघेण्या काळात कृतिशील सहभाग नोंदवून लोकांच्या मदतीला धावून आलात तर त्याच पूनम गेटवर तुमचा जाहीर सत्कार करेन, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. इंजेक्शन आणि लस पुण्याला घेऊन जात असल्याचा आरोप सोलापूरची राजकीय मंडळी करत आहेत. परंतु त्यांना वस्तुस्थितीची जाणीव असूनही दिशाभूल केली जात आहे. हा केवळ सोलापूर किंवा पुण्याचा प्रश्न नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. पक्षीय राजकारण केले जात आहे. आरोपांपेक्षा खासदारांनी सोलापूरचा कोटा वाढीव करून घेतला तर खासदार स्वामींचे त्याच पूनम गेटवर जाहीर सत्कार करेन असे भरणे म्हणाले.

सोलापूरशी असा होतो भेदभाव : जिल्ह्यात २१ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. रेमडेसीविर इंजेक्शनसाठी अनेक ठिकाणी जावे लागत आहे. जिल्ह्यासाठी रुग्ण संख्येच्या प्रमाणात केवळ २८ टक्के इंजेक्शन उपलब्ध होत आहेत तर इतर जिल्ह्यांना ४० ते ४५ टक्के इंजेक्शन मिळत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्यातही दुजाभाव केला जातो. ६० टनाची मागणी असताना ४० टन ऑक्सिजन दिला जात आहे. याचा परिणाम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर होत आहे. उलट पुणे व इतर जिल्ह्यासाठीच अधिक सुविधा कशा मिळतील असा त्यांचा प्रयत्न आहे. यामुळे सरकारकडून सोलापूरवर होणारा अन्याय दूर करावा, ऑक्सिजन, रेमडेसिविर व लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपच्या आमदार व खासदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...