आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन सख्या बहिणींशी विवाह:युवकावर अकलूज पोलिसांत अदखलपात्र गुन्हा, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

अकलूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळेवाडी (अकलूज) येथे एका युवकाने दोन सख्या जुळ्या बहिणींशी विवाह केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यावरुन नवरदेवावर अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल अवताडे (रा. अंधेरी, मुंबई) या युवकाने पिंकी व रिंकी पाडगावकर (रा. कांदिवली, मुंबई) या दोन सख्या जुळ्या बहिणींसोबत एकाच वेळी अकलूज येथील हॉटेल गलांडे प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये थाटामाटात विवाह केला होता. या कुतूहालात्मक विवाहाची बातमी सर्वप्रथम दैनिक दिव्य मराठीने प्रसिद्ध केली. त्यानंतर माळेवाडी येथील राहुल फुले यांनी अकलूज पोलिसांत नवरदेवाविरुद्ध तक्रार दिली. त्यावरुन अतुल अवताडे याच्यावर भादवी कलम ४९४ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...