आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी विद्यार्थ्यांची शाळेला भेट:हरिभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटचे पीच तयार करून देण्याचा उपक्रम

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरातील नामांकित शाळा हरिभाई देवकरण प्रशाला या शाळेमधील 1978 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटचे पीच तयार करून देण्याचा उपक्रम हाती घेतला.

या उपक्रमाचा भूमिपूजन समारंभ शाळेच्या मैदानावर करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे,संचालक दामोदर भण्डारी,शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हे पीच तयार करून क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि विद्यार्थ्यांची पिढी घडविण्याचे काम माजी विद्यार्थ्यांनी केले. हा अभिनंदनीय उपक्रम आहे, असे यावेळी श्रीकृष्ण चितळे म्हणाले.

याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळी चे श्रीरंग कुलकर्णी यांचाही सत्कार मनीषा वाले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी 1978 च्या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...