आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेसाठी अधिकाऱ्यांची लागली रांग:दिलीप माने यांचे आंदाेलन ; १५ दिवसांत कामाचे आश्वासन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. याप्रश्नी यापूर्वी निवेदनासह इशारा देऊन काहीच झाले नसल्याने माजी आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आंदोलन वाढू नये म्हणून महापालिका प्रशासनाने माने यांची भेट घेऊन १५ दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्यासह इतर कामे करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.

शहरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तातडीने डांबरीकरण करावे. सोरेगाव येथील मलनिस्सारण केंद्रांचा प्रश्ऩ सोडवावा, तसेच समांतर जलवाहिनीचा निविदा काढावी आदी मागण्यांसाठी माजी आमदार दिलीप माने गुरुवारी पालिकेसमोर उपोषण केले. दरम्यान, पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी रांग लावली. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी उपाेषणस्थळी येऊन माने यांच्याशी तासभर चर्चा केली. सार्वजनिक आराेग्य अभियंता संजय धनशेट्टी, उपअभियंता झेड. ए. नाईकवाडी यांनीही चर्चा केली. आयुक्त शिवशंकर यांचे स्वीय सहायक राहुल कुलकर्णी यांनी माने यांना अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे चर्चेसाठी नेले. त्यांच्याकडे चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेतले. जनतेच्या प्रश्नासाठी आमची बांधिलकी आहे. नागरिकांच्या प्रश्नाकडे पालिका आयुक्त दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन केले. यापुढे काम नाही झाले तर पुन्हा आंदोलन करू. असे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.

या मागण्या आणि आश्वासन
सर्व रस्त्याच्या निविदा काढल्या असून, त्यांची वर्कआॅर्डर दिली आहे. पावसाने विश्रांती दिल्यानंतर काम तत्काळ सुरू करून महिन्यात काम पूर्ण करण्यात येईल. गणेश विसर्जनापूर्वी रस्त्यावरील खड्डे प्रिमिक्सने बुजवू, सोरेेगाव येथील शेतात येणारे पाणी आठ दिवसांत थांबवण्यात येईल, समांतर जलवाहिनीचे निविदा स्मार्ट सिटी कंपनीकडून काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...