आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद परिसरात थाळीनाद आंदोलन:न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस मुलांबाळांसह निदर्शनात सहभागी

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रलंबित मानधनवाढ लागू करा, सेवानिवृत्ती वेतन द्या, महागाई भत्ता द्यावा, रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बुधवारी सोलापूरच्या जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद करीत राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निदर्शने करण्यात आली. यात जिल्हाभरातून दोन हजारांपेक्षा अधिक अंगणवाडी- सेविका मदतनीस यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तळपत्या उन्हात दुपारी साडेबारा वाजल्यापासून जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर थाळीनाद करीत महिलांनी निदर्शने केली. अनेक सेविका, मदतनीस त्यांच्या बालकांना घेऊन निदर्शनात सहभागी झाल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. महाविकासआघाडी सरकारला इशारा देण्यासाठी लाल साड्या नेसून सेविका व मदतनीस निदर्शनात सक्रिय होत्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मूळ मागण्या व इतर दैनंदिन प्रश्न तरी थोडा सोडवा या मागणीसाठी 20 जूनपासून यवतमाळ ते अमरावतीच्या पालकमंत्री घरापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यवंशी गायकवाड यांनी सांगितले. तसेच, मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना संघटनाच्या शिष्ट मंडळाने दिले.

  • या प्रमुख मागण्या
  • अंगणवाडी सेविका मदतनीस केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी आहेत. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते द्या.
  • महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताना राबवलेल्या किमान समान कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ व इतर सेवाशर्ती सुधारण्याचा प्रस्तावची पूर्तता त्वरीत करा.
  • एप्रिल महिन्याचे प्रलंबित मानधन त्वरित द्या,
  • वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, महागाईचा भत्ता व भरीव मानधनवाढ द्या.
  • शासन निर्णयानुसार सेविका, मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांना ज्येष्ठता आधारे अनुज्ञेय मानधन वाढ द्या.
  • मोबाइल पोषण ट्रॅकर ॲप मराठीमध्ये उपलब्ध करून द्या.
बातम्या आणखी आहेत...