आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा, संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जूनला देहूतून पंढरपूरकडे जाणार

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.

यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. पालखी सोहळ्याचे प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. देहू देवस्थान संस्थानाने आज याबाबतचा कार्यक्रम जाहिर केला आहे.

इनामदार वाड्यात पहिला मुक्काम

गेल्या वर्षी संत तुकारामांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. तब्बल 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वारकऱ्यांना विठुरायाला भेटता आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याआधी वारीवर, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षापासून बंद पडलेली परंपरा पुन्हा सुरु झाली. यंदाही वारकऱ्यांचा तितकाच उत्साह आहे. इनामदार वाड्यात पालखी पहिला मुक्काम करणार आहे.

तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार

आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभागी होणार आहे. आणि याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येणाऱ्या वर्षभरात पूर्ण होईल असे आश्वासन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. तसेच येथून जाताना वारकऱ्यांचे पाय भाजू नये याची काळजी घेतली जाणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.