आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून 3 दिवसआड पाणीपुरवठा:मनपा आयुक्तांची घोषणा, कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता लागू

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाणीपुरवठा सुरळीत व समान पद्धतीने करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात चार दिवसआड होणारा पाणीपुरवठा सर्वत्र तीन दिवसाआड होणार आहे.

शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्काॅडा प्रणाली, वितरण व्यवस्था सुरळीत करणे यासाठी प्रयत्न सुरु आहे. शहरात आता 110 एमएलडी पाणी येत असून, त्यात 60 एमएलडी वाढ होत 170 एमएलडी होईल. त्यामुळे सप्टेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल असे पालिका आयुक्त पी. शिवेशंकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात नमूद केले.

पालिका कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. यांचा फायदा पालिकेच्या सुमारे पाच हजार कर्मचारी होणार आहे. यामुळे पालिका तिजोरीवर दरमहा 40 लाख तर दरवर्षी सुमारे पाच कोटी बोजा पडणार आहे.

महापालिकेत कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना 12 टक्केवरुन तीन टक्के वाढ करत 15 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली. तीन टक्के महागाई भत्ता वाढ केले. ऑगस्ट महिन्यापासून वाढीव वेतन ग्राह्य धरुन सप्टेंबर महिन्याच्या वेतनात देण्यात येणार आहे.

अन्य घोषणा

  • जन्म-मृत्यू नोंदणी ऑनलाईन व खरेदी पोर्टलवरुन करणे.
  • घनकचरा व्यवस्थापन सुरळीत करणे.
  • अमृत योजना अंतर्गत हद्दवाढ भागात ड्रेनेजचे 75 टक्के काम पूर्ण, 30 हजार मिळकतीस फायदा होणार.
  • उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरु होणार.
  • मनपाचे उत्पन्न वाढवणे, वीज बिलात बचत.
  • महापौर चषक व पार्क मैदान येथे क्रिकेट स्पर्धा घेणार.

''सप्टेबर महिन्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करू. यासाठी पाणीपुरवठा विभागास आदेश दिले. पाक्र मैदानात क्रिकेट सामने होतील. कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासून तीन टक्के महागाई भत्ता देऊ.'' - पी शिवशंकर, पालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...