आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:रिक्षा अपघातातील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू ; सहा दिवस आयुष्यची लढाई लढली

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा दिवसांपूर्वी शेळगी रोडवर रिक्षा आणि ट्रकचा अपघात झाला होता. यामध्ये दहा जण गंभीर झाले होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी एक मुलगी, दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे लग्न होऊन एकच वर्ष झाले होते. या अपघातामुळे एक वर्षातच लग्नाच्या रेशीमगाठी संपल्या. जन्नतबी कोरबू असे तिचे नाव आहे. जन्नतबी शब्बीर कोरबू (वय २३ रा. विनायक नगर, शेळगी) ही महिलासुद्धा त्या रिक्षामध्ये बसून नातेवाइकांसोबत जात होती.

या अपघातामध्ये ती सुद्धा गंभीर जखमी झाली होती. शासकीय रुग्णालयामध्ये त्या महिलेवर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या महिलेचे लग्न एक वर्षापूर्वी झाले होते. लग्न मोठ्या थाटात झाले होते. सर्व मुलीप्रमाणे या महिलेनेसुद्धा आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. अचानक झालेल्या या अपघातामुळे तिच्या संसाराचे स्वप्न पूर्णपणे तुटून गेले. सहा दिवस पूर्णपणे ती आयुष्याची लढाई लढत होती. परंतु शुक्रवारी ती लढाई हरली.

बातम्या आणखी आहेत...